बदाम लागवड

भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. बदामबीज हे पुष्टीदायक व शक्तिवर्धक आहे. त्याच्या लागवडीखाली २,४०० हेक्टर क्षेत्र असून त्यापासून ५,६०० क्विंटल बदामाचे उत्पादन होते, तसेच हिमाचल प्रदेशात २०० हेक्टरात पीक काढतात. उत्तर प्रदेशातील डोंगराळ भागात सुमारे ५,००० हेक्टरात अक्रोड व बदाम यांची लागवड केली आहे.
जमिनीचा प्रकारया पिकासाठी खोल व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन बदाम वृक्षांना उपयुक्त असते कारण त्यांची मुळे खोल जातात.
हवामानथंड पण कोरडी आणि फळे पिकण्याच्या वेळी गरम हवा बदामास आवश्यक असते तसेच ६० सेंमी.किंवा थोडा अधिक पाऊस असल्यास पीक चांगले येते.
पिकाची जातकॅलिफोर्नियापेपर,द्रके,IXL,मर्सेड,मुखदूम,ने -प्लस अल्ट्रा,नॉन-परेल,प्राण्याज,प्रिमोर्सकिज,शालीमार,शेल,वारिस,
लागवडभारतात बियांपासून बहुतांश लागवड होते. त्याकरिता जुले-सप्टेंबरात जमविलेले बी डिसेंबर मध्ये पन्हेरीत पेरतात व वर्षानंतर रोपे बाहेर कायम जागी लावतात. याशिवाय कलमांनीही निवडक वाणांची लागवड करतात. वृक्षांची लागण करण्यास ६ – ८ मी.अंतरावर १ मी. व्यासाचे खोल खड्डे करतात.
खत व्यवस्थापनकंपोस्ट खते व नायट्रोजनुक्त खते माती परीक्षण करून द्यावीत.
पाणी व्यवस्थापनया पिकासाठी पावसाळ्यामध्ये थोडा अधिक पाऊस असल्यास पीक चांगले येते तसेच उन्हाळ्यात पिकाच्या आवश्यकते नुसार पाणी द्यावे.
उत्पादनरोपे लावल्या पासून सुमारे तीन ते चार वर्षांत फळे येण्यास सुरवात होते. आठ ते दहा वर्षांत भरपूर उत्पन्न मिळते.साधारणत जुलै ते सप्टेंबर मध्ये फळातून आठळ्या डोकावू लागतात. त्या वेळी ती फळे काढून हातांनी सोलून आठळ्या उन्हात वाळवितात. काश्मीर मध्ये प्रत्येकी एका झाडापासून २.७ किलो ग्राम फलोत्पादन होते. याची साठवणूक आठळ्या थंड,कोरड्य व हवा खेळणाऱ्या जागेत ठेवल्यास सहा महिन्यां पर्यंत टिकतात. तसेच शीतगृहात ठेवल्यास अधिक काळ टिकून राहू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *